गोवा खबर

गावांमधील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकणार : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : सावईवेरे येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय दुमजली इनडोअर क्रीडा संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या संकुलात बॅडमिंटन, टेबलटेनिस आणि कॅरम यांसारख्या खेळांची उत्तम सोय करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील मुलांना योग्य साधनसुविधा मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करू शकतात, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी आमदार गोविंद गावडे, जिल्हा पंचायत सदस्य प्रीतेश गावकर आणि सरपंच शोभा पेरणी उपस्थित होते.

गावाच्या विकासासोबतच शेतीकडे आणि आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना या क्रीडा संकुलाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Trending

Exit mobile version