गोवा खबर

आगामी निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवणार : सुरेंद्र फुर्तादो

Published

on

Spread the love

गोवा खबर : पणजी महानगरपालिकेचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी जाहीर केले आहे की, २०२७ ची विधानसभा निवडणूक ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून पणजी मतदारसंघातून लढवणार आहेत.

महापालिका निवडणुकीतील पराभवावर बोलताना ते म्हणाले की, हा माझा पराभव नसून पणजीवासीयांचा पराभव आहे. गेल्या ४० वर्षांत आपण पणजी शहरासाठी अनेक सेवाभावी कामे केली असून, महापौर असताना आणलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सध्या पालिकेकडून योग्य प्रकारे केला जात नाही. पणजीतील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी आता आपण सक्रिय राज्यकारभारात उतरत असून, लोकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Trending

Exit mobile version