गोवा खबर

मडगाव येथे नवीन ESI मेडिकल कॉलेज लवकरच; केंद्राकडून कार्यवाहीला गती देण्याचे आश्वासन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार व रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. यावेळी गोव्यातील मडगाव येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन ESI मेडिकल कॉलेज प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी या मेडिकल कॉलेजच्या कार्यान्वयन प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकल्पामुळे गोव्यातील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्र अधिक मजबूत होण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Trending

Exit mobile version