गोवा खबर

केंद्रीय बंदरे आणि जलवाहतूक मंत्र्यांकडून गोव्याच्या सागरी विकासाचे आश्वासन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय बंदरे, जहाजोद्योग व जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन गोव्याच्या सागरी पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत विस्तृत चर्चा केली. या बैठकीत गोव्याच्या किनारी भागांचा सर्वांगीण विकास, सागरी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, बंदर विकास, जलवाहतूक आणि किनारी अर्थव्यवस्थेला चालना देण्याबाबत विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.

देशातील किनारी राज्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, गोव्याच्या किनारपट्टीचा विकास, पर्यटनवाढ तसेच सागरी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी या केंद्रीय सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Trending

Exit mobile version