गोवा खबर

वाळपई सरकारी इस्पितळात आधुनिक ‘इको’ हृदयरोग उपचार यंत्राचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी वाळपई येथील सरकारी इस्पितळात आधुनिक पद्धतीच्या ‘इको’ यंत्राची व्यवस्था करण्यात आली आहे. एसीजीएल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या सहभागातून ही आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन करण्यात आले.

हृदयविकार किंवा स्ट्रोक आलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक असते. त्या दृष्टीने हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरेल. गोव्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे सक्षम करून शहरी भागाप्रमाणेच सर्व आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि मोफत उपचार प्रत्येक कुटुंबाला उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Trending

Exit mobile version