गोवा खबर

वजरी येथील सामाजिक कार्यकर्त्या भारती सावळ यांची हस्तकला महामंडळाच्या संचालकपदी निवड

Published

on

Spread the love

 गोवा खबर : वजरी मडकई येथील सामाजिक कार्यकर्त्या भारती सावळ यांची हस्तकला महामंडळाच्या संचालक पदी चेअरमन प्रवीण आर्लेकर  यांनी निवड जाहीर केली.

 पत्रकार महादेव गवंडी यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक पद खाली होते.त्या जागी चेअरमन प्रवीण आर्लेकर यांनी भारती सावळ यांची निवड केली.

भारती सावळ यांची संचालक पदी निवड झाल्याबद्दल पेडणे  तालुक्यातून सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

 भारती सावळ यानी प्रतिक्रिया देताना हस्तकला महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर यांच्या  सहकार्यातून पेडणे  तालुक्यातील जेवढे हस्तकलाकार आहेत त्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच हस्तकलाकारांचे काही प्रश्न समस्या आहेत त्या समस्या चेअरमन प्रवीण आर्लेकर यांच्यामार्फत सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

Trending

Exit mobile version