गोवा खबर

स्टोलन’ चित्रपटाच्या यशानंतर साळकर यांनी मानले सर्वांचे आभार; ‘स्क्रीनरायटर्स असोसिएशन’ पुरस्कार मिळाल्याने व्यक्त केला आनंद

Published

on

Spread the love

गोवा खबर : ‘स्टोलन’ (Stolen) या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय यशानंतर चित्रपटाशी जोडले गेलेले डॉ. स्वप्नील साळकर यांनी प्रेक्षक, कुटुंब आणि आपल्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक पातळीवर पोहोचल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

‘स्टोलन’ या चित्रपटाची सुरुवात नोव्हेंबर २०१९ मध्ये लेखक म्हणून झाली होती, असे डॉ. साळकर यांनी सांगितले. चित्रपट चांगला होईल याची खात्री होती, पण त्याला इतके मोठे यश मिळेल असे वाटले नव्हते. या चित्रपटाने व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापासून सुरुवात करून अनेक देशांमधील चित्रपट महोत्सवांमध्ये यश मिळवले आहे. नुकताच या चित्रपटाला ‘स्क्रीनरायटर्स असोसिएशन’चा (SWA) मानाचा पुरस्कारही मिळाला आहे.
या पुरस्काराबद्दल बोलताना डॉ. साळकर म्हणाले की, चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज आणि मोठ्या चित्रपटांशी आमची स्पर्धा होती. अशा बड्या चित्रपटांच्या शर्यतीत आमच्या चित्रपटाला विजेतेपद मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.

आपल्या यशाचे श्रेय देताना ते पुढे म्हणाले की, “कोणतीही व्यक्ती एकटी काहीही करू शकत नाही. मी आज जे काही आहे ते माझे आई-वडील, बहीण सोनल, माझे चुलत भाऊ, माझे मित्र, निर्माते गौरव, दिग्दर्शक करण आणि संपूर्ण ‘टीम स्टोलन’ मुळे आहे.” यासोबतच त्यांनी संपूर्ण गोवा राज्य आणि ज्यांनी या प्रवासात त्यांना पाठिंबा दिला व ज्यांनी दिला नाही, अशा सर्वांचेच आभार मानले आहेत.

Trending

Exit mobile version