गोवा खबर

गोव्यात 26 आणि 27 मे रोजी यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Published

on

Spread the love

गोवा खबर : हवामान विभागाने गोव्यासाठी 26 आणि 27 मे रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेत विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

26 मे ते 1 जून 2026 या कालावधीसाठी जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, सुरुवातीचे दोन दिवस हवामान अस्थिर राहणार असून त्यानंतर पुढील काही दिवसांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचे अंदाजात नमूद करण्यात आले आहे.

हवामान खात्याने नागरिकांना विशेषतः सायंकाळच्या वेळेत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Trending

Exit mobile version