गोवा खबर

पर्यावरण कार्यकर्ते व धर्मगुरू फादर बोलमॅक्स परेरा यांचे निधन

Published

on

Spread the love

गोवा खबर : चिकलिम चर्चचे पॅरिश प्रिस्ट, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते फादर बोलमॅक्स परेरा यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, बांबोळी येथे उपचार सुरू असताना पहाटे सुमारे 4.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

फादर बोलमॅक्स परेरा यांच्या निधनामुळे गोव्यात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि पर्यावरण संरक्षणासाठीच्या सक्रिय भूमिकेमुळे त्यांनी अनेकांच्या जीवनावर प्रभाव टाकला होता.

त्यांच्यावर 28 मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Trending

Exit mobile version