गोवा खबर : गोव्याचे डॉ. स्वप्नील साळकर यांनी OTT चित्रपट “Stolen” साठी प्रतिष्ठेच्या Screenwriters Association Awards 2026 मध्ये Best Screenplay आणि Best Story हे दोन महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत. मुंबईतील Taj Lands End येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.
अनेक मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा करत “Stolen” या चित्रपटाने विजय मिळवला. याआधी Filmfare आणि Screen Awards मध्येही डॉ. साळकर यांना सन्मान मिळाला असून हा त्यांचा तिसरा मोठा पुरस्कार ठरला आहे.