गोवा खबर

पक्षात कुणीही ताबा घेऊ शकत नाही; मी पक्षासोबत कायम आहे : आमदार विरेश बोरकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : मी नेहमी सत्याच्या मार्गावर चाललो असून आमदार म्हणून माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. कालच मी गोव्यात दाखल झालो असून पक्षाच्या संविधानानुसार योग्य स्पष्टीकरण देण्यासाठी पक्ष कार्यालयात जाणार आहे, असे आमदार विरेश बोरकर यांनी स्पष्ट केले.

आरजीपीमधील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना बोरकर म्हणाले की, “हा आमच्या पक्षातील अंतर्गत लोकशाहीचा विषय आहे आणि कुणीही पक्षावर ताबा मिळवू शकत नाही. पक्षाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे देईन आणि त्यानंतर माध्यमांसमोर सविस्तर भूमिका मांडेन.”

मनोज परब हे आमचे नेते आहेत आणि ते कायम आमच्या मनात राहतील. मी नेहमी पक्षासोबत आहे, असेही बोरकर यांनी सांगितले.

Trending

Exit mobile version