गोवा खबर

गोव्याच्या दिशेने येणाऱ्या संशयास्पद बांगलादेशींना हुबळीत रोखले

Published

on

Spread the love

गोवा खबर : पश्चिम बंगाल आणि मुंबईतील वांद्रे भागात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध झालेल्या कारवाईनंतर, गोव्याच्या दिशेने निघालेल्या संशयास्पद बांगलादेशी नागरिकांच्या एका मोठ्या गटाला कर्नाटक पोलिसांनी हुबळी येथे ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासणीत या लोकांकडे कोणतीही वैध भारतीय कागदपत्रे आढळलेली नाहीत.

पर्यटन हंगाम आणि बांधकाम क्षेत्रामुळे गोव्यातील गर्दीत ओळख लपवणे सोपे जाईल, या हेतूने हे संशयित गोव्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते, असा संशय आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सूचनेनंतर गोवा पोलीस पूर्णपणे सतर्क झाले असून सीमाभागातील चेकनाके, रेल्वे स्थानके आणि बस स्थानकांवर कडक पाळत ठेवली जात आहे.

स्थानिक पोलीस आणि विशेष शाखांकडून हॉटेल व्यावसायिक, भाडेकरू आणि बांधकाम साईट्सवरील मजुरांची कसून पडताळणी सुरू असून, नागरिकांनाही परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version