गोवा खबर : मळा-पणजी ते भाटले या मार्गावरील रस्ता जलवाहिन्यांच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी १६ मे पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
७०० मिमी आणि ६०० मिमी क्षमतेच्या जुन्या व नवीन जलवाहिन्या जोडण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जात आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.