गोवा खबर

पाय गमावलेल्या बालकाला मंत्री विश्वजीत राणेंकडून २५ लाखांची मदत

Published

on

Spread the love

गोवा खबर : वाळपई सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे ११ वर्षीय गौरव सावर्डेकर याला आपला पाय गमवावा लागला.

या घटनेची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गौरवच्या कुटुंबाला आपल्या ट्रस्टकडून २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, दोषी डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. राणे यांनी स्पष्ट केले की, वैद्यकीय क्षेत्रात असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.

Trending

Exit mobile version