गोवा खबर

ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ 88 तासांची दौड

Published

on

Spread the love

गोवा खबर:भारतीय हवाई दलाने 07 मे ते 10 मे 26 या कालावधीत नवी दिल्ली इथे 88 तासांची “ऑपरेशन सिंदूर स्मरणार्थ दौड” आयोजित केली होती.

हा कार्यक्रम भारतीय हवाई दलाद्वारे करण्यात आलेल्या 88 तासांच्या यशस्वी हवाई कारवायांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता, या कारवायांच्या माध्यमातून हवाई दलाने आपली निर्णायक आणि अचूक हल्ले करण्याची क्षमता सिद्ध केली होती. भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराच्या सर्व कमांड्समधील एकूण 600 धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला.

ही दौड 07 मे 26 रोजी पहाटे 01 वाजून 05 मिनिटांनी इंडिया गेट इथून प्रशासनाच्या प्रभारी हवाई अधिकाऱ्यांनी  हिरवा झेंडा दाखवल्यावर रवाना झाली आणि 10 मे 26 रोजी संध्याकाळी पाच वाजता नवी दिल्लीतल्या वायुसेना तळावर हवाई दल प्रमुखांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सांगता झाली.

ही दौड सलग 88 तास ‘रिले’ स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. नागरी प्रशासनाने या कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामध्ये नागरी स्वयंसेवकांनीही मोठ्या उत्साहाने भाग घेतला.

भारतीय हवाई दलाच्या जवानांमध्ये सांघिक भावना जोपासणे आणि त्यासोबतच लोकांशी संपर्क वाढवणे, तसेच भारतीय संरक्षण दलांची दृश्यमानता वाढवणे हा या आयोजनामागचा उद्देश होता.

“ऑपरेशन सिंदूर स्मरणार्थ दौड”चे यशस्वी आयोजन हा  भारतीय हवाई दलाच्या कार्यान्वित इतिहासातल्या एका महत्त्वपूर्ण कामगिरीप्रति सन्मान तर होताच शिवाय सार्वजनिक सहभागातून साध्य झालेल्या उत्कृष्ट सांघिक कार्याचे प्रतीक आणि भारतीय हवाई दलाच्या मूल्यांचे दर्शन घडवणारा उपक्रम होता.

Trending

Exit mobile version