गोवा खबर

गोव्यात ‘हेल्थ विथ आयुर्वेद’ मोहिमेला सुरुवात; मोफत उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून आणि ‘Check by Dr. 2’ उपक्रमांतर्गत गोव्यात ५ मे ते ५ जून दरम्यान ‘हेल्थ विथ आयुर्वेद’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. गोवा आयुर्वेदिक कौन्सिलच्या अध्यक्षा डॉ. स्नेहा भागवत यांनी या मोहिमेची माहिती दिली.

या मोहिमेत नागरिकांना मोफत सल्ला, मोफत उपचार आणि मोफत औषधे दिली जाणार आहेत. रुग्णांची नोंदणी आणि उपचारांची माहिती ठेवण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत आहे.

गोव्यातील ७० हून अधिक खाजगी आयुर्वेदिक डॉक्टरांसह सर्व CHC, PHC, जिल्हा रुग्णालये, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि डीचोली येथील दिनदयाळ रुग्णालयात ही सेवा उपलब्ध आहे.

या मोहिमेद्वारे पंचकर्म, दिनचर्या आणि ऋतुचर्या यांसारख्या आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा प्रसार केला जात आहे. डॉ. स्नेहा भागवत यांनी गोवेकरांना या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी goaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवळच्या नोंदणीकृत आयुर्वेदिक डॉक्टरांशी संपर्क साधावा.

‘Health with Ayurveda’ Campaign Launched in Goa; Free Treatment Facilities Available

The Goa government has launched the ‘Health with Ayurveda’ campaign from May 5 to June 5 under the guidance of Chief Minister Dr. Pramod Sawant and the ‘Check by Dr. 2’ initiative. Goa Ayurvedic Council President Dr. Sneha Bhagwat shared details about the month-long campaign.

Under this initiative, patients will receive free consultations, free treatments, and free medicines. A dedicated software system has also been introduced for patient registration and real-time monitoring of treatments and medicine availability.

The services are available through more than 70 private Ayurvedic doctors across Goa, along with all CHCs, PHCs, District Hospitals, Gomantak Ayurveda Mahavidyalaya, and Deendayal Hospital in Bicholim.

The campaign also aims to promote Ayurvedic practices such as Panchakarma, Dinacharya, and Ritucharya among the public. Dr. Bhagwat urged citizens to take advantage of the initiative and seek more information through the goaonline.gov.in portal or nearby registered Ayurvedic practitioners.

Trending

Exit mobile version