गोवा खबर

४७ लाखांचा नवा स्लॅब कल्व्हर्ट;गावकर वाडा भूमिपालला मिळाला सुरक्षिततेचा नवा मार्ग!

Published

on

Spread the love

गोवा खबर : गावकरवाडा भूमिपाल परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नव्या स्लॅब कल्व्हर्टचे उद्घाटन आमदार डॉ. देविया राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे ४७ लाख खर्च करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.

जुना व जीर्ण झालेला कल्व्हर्ट हटवून ५ मीटर क्लिअर स्पॅन असलेली नवी मजबूत रचना उभारण्यात आली आहे. या कामामुळे अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या सुरक्षेच्या समस्या दूर झाल्या आहेत.

विशेषतः पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात आला असून, नव्या कल्व्हर्टमुळे वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे. तसेच पाण्याचा निचरा सुधारल्यामुळे पूरस्थितीचा धोका कमी होणार आहे.

याबाबत बोलताना आमदार डॉ. देविया राणे म्हणाल्या की, “या प्रकल्पामुळे गावकरवाडा भूमिपाल येथील नागरिकांची दीर्घकालीन समस्या सुटली असून, परिसरातील संपर्क आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.”

Trending

Exit mobile version