गोवा खबर : सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी राज्याचे ‘सहकार धोरण २०२६’ जाहीर केले आहे. गेल्या १५ महिन्यांत सहकारी संस्थांच्या थकीत कर्जात लक्षणीय घट झाली असून १५० खात्यांमधील केवळ ६५ लाख रुपये कर्ज थकीत असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल परिवर्तनावर भर : या धोरणांतर्गत सहकारी संस्थांचे १००% संगणकीकरण आणि पारदर्शक लेखापरीक्षण करण्यावर भर दिला जाणार आहे.
सामंजस्य करार : गोवा इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स यांसारख्या संस्थांसोबत प्रशिक्षण आणि विकासासाठी करार करण्यात आले आहेत.