गोवा खबर : पर्वरी येथील सहापदरी उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, यंदाच्या गणेश चतुर्थीपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री दिगंबर कामत यांनी दिले आहे. पुलाच्या हॉटमिक्सिंग कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
प्रकल्प खर्च: सार्वजनिक बांधकाम खात्याने विविध विकासकामांसाठी ३,००० कोटींचा वार्षिक आराखडा केंद्राकडे पाठवला आहे.
मुदतवाढ: पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रखडलेल्या १०२ कोटींच्या कामांना २०२८ पर्यंत मुदतवाढ मिळवण्यात यश आले आहे.
ड्रिम प्रोजेक्ट: पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी या पुलाला आपला ‘ड्रिम प्रोजेक्ट’ संबोधले असून यामुळे पर्वरीतील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.