गोवा खबर

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांची उपलब्धता आणि वेळेत वितरणाचा घेतला आढावा

Published

on

Spread the love


गोवा खबर:केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, चालू शैक्षणिक सत्रासाठी, एनसीईआरटी म्हणजेच, राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या पाठ्यपुस्तकांची उपलब्धता आणि योग्य वेळी वितरणाच्या कामांचा आज आढावा घेतला. या आढावा बैठकीला, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव, संजय कुमार यांच्यासह शिक्षण मंत्रालय आणि एनसीईआरटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रधान यांनी आगामी एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांच्या तयारीचाही आढावा घेतला. तसेच, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पुस्तकांचा किती साठा उपलब्ध आहे, याची माहिती घेतली, त्यानंतर, राज्यातले संबधित अधिकारी आणि वितरकांमधील समन्वय योग्य आहे ना याची खातरजमा करत, सर्व, विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, पुस्तके वेळेत मिळतील, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

कोणत्याही विद्यार्थ्याला पुस्तके उशिरा मिळाली, म्हणून त्रास होऊ नये, यावर भर देत, प्रधान यांनी सर्व अधिकाऱ्यांना पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले. तसेच, जिथे आवश्यक तिथे छपाई क्षमता वाढवा, आणि शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहचतील, यावर लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ई-परीक्षेच्या माध्यमातून, डिजिटल पाठ्यपुस्तके उपलब्ध करणे, ही तात्पुरती सुविधा देखील उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी अधोरेखित केले, जेणेकरुन,  सर्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पुस्तक पोहोचेपर्यन्त, त्यांच्या शिक्षणात अडथळा येणार नाही.

Trending

Exit mobile version