गोवा खबर

‘मगोप’चे २१ आमदार निवडून द्या, सुदिन ढवळीकर मुख्यमंत्री होतील : दीपक ढवळीकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठे विधान केले आहे. जर गोव्याच्या जनतेने मगोपचे २१ आमदार निवडून दिले, तर सुदिन ढवळीकर नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि बदलासाठी मगोपची सत्ता येणे गरजेचे आहे. सध्या भाजप ही मोठी संघटना असली तरी स्थानिक पातळीवर लोक बदलाचा विचार करत आहेत. ढवळीकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, भाजपनेही यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

Trending

Exit mobile version