गोवा खबर

उत्पल पर्रीकरांचा भाजपला थेट सवाल : “रवी नाईकांच्या मुलाला तिकीट, मग मला का नाकारले?”

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याच्या राजकारणात उत्पल पर्रीकर यांनी पुन्हा एकदा भाजपच्या धोरणांवर टीका केली आहे. भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या घडांमोडींबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दिवंगत नेते रवी नाईक यांना श्रद्धांजली म्हणून जर त्यांच्या मुलाला (रितेश नाईक) उमेदवारी दिली जाते, तर मग हाच निकष दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या बाबतीत का लावला गेला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एका पत्रकार परिषदेत बोलताना पर्रीकर म्हणाले की, सध्याचा भाजप मनोहर पर्रीकरांच्या विचारधारेवर चालताना दिसत नाही. पूर्वीची पारदर्शकता, साधेपणा आणि लोकाभिमुख निर्णयप्रक्रिया आता लोप पावली आहे. याच कारणांमुळे मी सध्या पक्षाबाहेर राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Trending

Exit mobile version