पर्वरीत आरोग्य शिबिराचे आयोजन; नागरिकांचा प्रतिसाद
गोवा खबर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘चेक बाय डॉक्टर’ उपक्रमांतर्गत पर्वरी आरोग्य केंद्रात विशेष वैद्यकीय शिबिर भरवण्यात आले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले.
- आवाहन: नियमित तपासणी केल्यास आजारांचे वेळीच निदान होते, त्यामुळे नागरिकांनी, विशेषतः महिलांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खंवटे यांनी केले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.