विमान प्रवास, स्वतंत्र पोस्टल सर्कल आणि शेतकरी हिताच्या मागण्या
गोवा खबर : राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी संसदेच्या अधिवेशनात गोव्याशी निगडित तब्बल ३८ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे गोवेकरांना केंद्र सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे मुद्दे: गोवा ते मुंबई विमान प्रवास सामान्यांना परवडत नसल्याने महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, महाराष्ट्रासोबत असलेले गोव्याचे ‘पोस्टल सर्कल’ स्वतंत्र करावे, जेणेकरून प्रशासकीय कामे जलद होतील.
शेतकरी हित: जंगली जनावरांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्वतंत्र फळांच्या झाडांची लागवड आणि शेतकरी सन्मान निधीच्या लाभाबाबतही त्यांनी आग्रही मागणी केली.