प्रथम उपपंतप्रधान मँतूरोव्ह यांनी व्यापार, खते, संपर्क जोडणी आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंधाबद्दलच्या प्रगतीबद्दल पंतप्रधानांना दिली माहिती
पंतप्रधानांनी डिसेंबर 2025 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताला दिलेल्या यशस्वी भेटीच्या आठवणींना दिला उजाळा
शिखर परिषदेतील फलनिष्पत्तीच्या अंमलबजावणीसाठी होत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले समाधान
पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना दिल्या शुभेच्छा
गोवा खबर:रशियाचे प्रथम उपपंतप्रधान महामहीम डेनिस मँतूरोव्ह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
प्रथम उपपंतप्रधान मँतूरोव्ह यांनी, व्यापार आणि आर्थिक भागीदारी, खते, संपर्क जोडणी तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध यांसह परस्पर हिताशी संबंधीत विविध क्षेत्रांमधील सहकार्यपूर्ण भागिदारींच्या प्रगतीबद्दलची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2025 मध्ये 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या निमीत्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताला दिलेल्या यशस्वी भेटीच्या आठवणींना उजाळा दिला.
भारत आणि रशियामधील विशेष तसेच विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने वार्षिक शिखर परिषदेतील फलनिष्पत्तीच्या अंमलबजावणीसाठी उभय देश सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांबद्दलही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना शुभेच्छा दिल्या तसेच परस्परांमधील सातत्यपूर्ण संवादासाठी आपण उत्सुक असल्याचेही सांगितले.