गोवा खबर

केंद्र सरकारने गोवा सरकार आणि कोचीन बंदर प्राधिकरणाला ‘संपन्न’ ‘प्लॅटफॉर्म-ॲज-अ-सर्व्हिस’ उपलब्ध करून देण्यासंबंधीच्या करारावर केली  स्वाक्षरी 

Published

on

Spread the love

“दूरसंचार विभागाने ‘संपन्न’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, ‘सेवा तुमच्या दारात’ ही संकल्पना इतर संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी गोवा सरकार आणि कोचीन  बंदर प्राधिकरणासोबत केली भागीदारी ” – ज्योतिरादित्य एम. सिंधिया.

गोवा खबर:केंद्र सरकारने  तंत्रज्ञान-सक्षम आणि नागरिक-केंद्रित प्रशासनाला बळकट करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गोवा राज्य सरकार आणि कोचीन बंदर प्राधिकरण यांनी दूरसंचार विभागाचा ‘संपन्न ‘ हा प्रमुख डिजिटल पेन्शन आणि वित्तीय व्यवस्थापन प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली .


‘संपन्न’ (System for Accounting and Management of Pension) ही  पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया मिशनच्या संकल्पनेच्या धर्तीवर  विकसित केलेली एक वेगवान  ऑनलाइन सर्वसमावेशक पेन्शन व्यवस्थापन प्रणाली आहे. यामध्ये प्रकरण दाखल करण्यापासून ते पेन्शनचे वितरण आणि लेखांकन करण्यापर्यंतच्या संपूर्ण पेन्शन प्रशासनाच्या कामकाजाचा  समावेश आहे. ही प्रणाली 29 डिसेंबर  2018 रोजी  पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आली होती.

संपन्न ही दूरसंचार विभागाची एक क्लाउड-आधारित,व्यापक  निवृत्तीवेतन व्यवस्थापन प्रणाली असून  संचार लेखा महासंचालक (CGCA) यांच्या कार्यालयाद्वारे व्यवस्थापित केली जाते. एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे निवृत्तीवेतन मंजुरी, अधिकृतता, लेखांकन आणि देयके यांचे सुव्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने  याची रचना करण्यात आली आहे.
गोवा राज्य सरकार आणि कोचीन बंदर प्राधिकरणाद्वारे  संपन्नचा स्वीकार करण्यात आल्यामुळे  सिद्ध झालेल्या राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मच्या पुनर्वापराद्वारे आधुनिक, उत्तरदायी आणि नागरिक-केंद्रित शासनाच्या उद्दिष्टाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

या प्रसंगी बोलताना, संचार मंत्री म्हणाले की, “संपन्न आता दरमहा सरासरी 1,650 कोटी रुपयांचे निवृत्तीवेतन वितरित करत आहे आणि त्याद्वारे आतापर्यंत सुमारे 72,000 कोटी रुपयांचे एकूण वितरण झाले आहे.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय दृष्टिकोनातील  बदल अधोरेखित केला . यामुळे आता  पूर्वीच्या काळाप्रमाणे सार्वजनिक सेवांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये धावपळ करावी लागत नाही  तर आता शासनाच्या केंद्रस्थानी  नागरिक आहेत.

संचार मंत्री   म्हणाले, “सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याची ही संकल्पना इतर संस्थांपर्यंत नेण्यासाठी दूरसंचार विभागाने  आज गोवा राज्य सरकार आणि कोचीन बंदर प्राधिकरणासोबत एक करार केला आहे.” त्यांनी ‘संपन्न’ वर ऑनबोर्डिंग  झाल्याबद्दल गोवा सरकार आणि कोचीन बंदर प्राधिकरणाचे अभिनंदन केले आणि ‘संपन्न’ पोर्टलवर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

त्यांनी टपाल विभाग आणि दूरसंचार विभागाला, टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांना समाविष्ट करण्यासाठी ‘संपन्न’ प्रणालीचा अवलंब करण्यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया पूर्ण  करण्याचे निर्देशही दिले.

संचार मंत्र्यांनी ‘संपन्न कॉफी टेबल बुक’चे प्रकाशनही केले. या पुस्तकामध्ये वेगवान  पारदर्शक आणि कार्यक्षम सार्वजनिक सेवा प्रदान करण्यात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची वाढती भूमिका अधोरेखित केली  आहे.

Trending

Exit mobile version