गोवा खबर

गोव्यात आजपासून पहिल्या ‘डिजिटल जनगणने’चा श्रीगणेशा

Published

on

Spread the love

गोवा खबर : देशाच्या इतिहासातील पहिल्या डिजिटल जनगणनेला आज, १ एप्रिलपासून गोव्यात सुरुवात होत आहे. आयएएस अधिकारी चेष्टा यादव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही जनगणना दोन टप्प्यात होणार असून ३,०८६ कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • महत्त्वाचे तपशील:
  • पहिला टप्पा: १ एप्रिल ते १५ एप्रिल (स्व-गणनेचा टप्पा).
  • घर सूचीकरण: १६ एप्रिल ते १५ मे २०२६ या काळात घरांची नोंदणी होईल.
  • दुसरा टप्पा: ९ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान मुख्य ‘लोकसंख्या गणना’ होईल.
  • विशेष सुविधा: नागरिकांसाठी १६ भाषांमध्ये (कोंकणीसह) खास मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे, ज्यावर नागरिक स्वतःची माहिती नोंदवू शकतील.

Trending

Exit mobile version