गोवा खबर

राज्यात हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक ‘गदापूजन’

Published

on

Spread the love

गोवा खबर : हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने यंदाही सामूहिक ‘गदापूजन’ उपक्रम राज्यात ठिकठिकाणी राबवण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या अंतर्गत सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्र, श्री हनुमान चालीसा, तसेच ‘श्री हनुमते नम:’ हा नामजप सामूहिकरीत्या केला जातो. तसेच ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात येते. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात येते.  

हा उपक्रम आतापर्यंत मयते, अस्नोडा येथील श्री मारुति मंदिर, तिस्क-उसगाव येथील श्री मारुती मंदिर, सुधा कॉलनी-डिचोली येथील श्री मारुती मंदिर, मुगाळी-मडगाव , महादेवभाट-वळवई येथील श्री महादेव मंदिर येथे मिळून एकूण ८ ठिकाणी राबवण्यात आला आहे, तसेच हा उपक्रम राज्यात एकूण ५० ठिकाणी घ्यायचे नियोजन आहे. या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

Trending

Exit mobile version