गोवा खबर : डिजिटल व्यवहार सोपे आणि सुलभ करणे ही काळाची गरज आहे. भीम अॅप सध्या १५ पेक्षा अधिक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असून असल्याचे भरतोय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांनी सांगितले. एनपीसीआय भीम सर्विसेस लिमिटेडने आज भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची भीम (BHIM) अँपच्या सदिच्छादूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. डिजिटल पेमेंट क्षेत्रात दशक पूर्ण करत असताना, भीम अॅप आता विस्तार आणि सर्वसमावेशकतेवर भर देत आहे. एनपीसीआय भीमच्या एमडी आणि सीईओ ललिता नटराज यांच्या मते, धोनी यांची शांतचित्तता आणि विश्वासार्हता भीमच्या सुरक्षित प्लॅटफॉर्मशी तंतोतंत जुळते.
या भागीदारीबद्दल बोलताना धोनी म्हणाले की, डिजिटल व्यवहार सोपे आणि सुलभ करणे ही काळाची गरज आहे. भीम अॅप सध्या १५ पेक्षा अधिक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असून, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात (Tier 2 & 3 शहरे) आपली पकड मजबूत करत आहे. कमी इंटरनेटमध्येही चालणारे हे अॅप आता धोनी यांच्या लोकप्रियतेमुळे घराघरांत पोहोचण्यासाठी सज्ज झाले आहे.