गोवा खबर

मुंबई सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले

Published

on

Spread the love

 

 

 

गोवा खबर:मुंबई सीमा शुल्क विभाग –III च्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी 17, मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रभर चाललेल्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत, उल्लेखनीय दक्षता आणि समन्वय राखत अंमली पदार्थांच्या तस्करीचे विविध  प्रयत्न हाणून पाडले.

प्रगत प्रवासी सूचना प्रणाली (APIS) आणि स्पॉट प्रोफाइलिंगचा वापर करून विकसित केलेल्या गुप्त माहितीच्या आधारे, एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकहून येणाऱ्या 4 प्रवाशांना ओळखले आणि अडवले. त्यांची सतर्कता आणि वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे हायड्रोपोनिक गांजाच्या तस्करीची 4 संशयित प्रकरणे उघडकीस आली. अधिक तपास केला असता अंदाजे 64.394 किलोग्रॅम तस्करी केलेला माल जप्त करण्यात आला, ज्याचे अंदाजित बाजारमूल्य 64.394 कोटी रुपये आहे. अटक केलेल्यांपैकी एक परदेशी नागरिक होता. तस्करीचा मोठा साठा घेऊन जाण्यासाठी परदेशी नागरिकांना सामील करून घेण्याची एक नवीन पद्धत यातून समोर आली आहे. नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा,1985 च्या तरतुदींनुसार सर्व 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये 18, मार्च  2026 पर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  येथील विमानतळ आयुक्तालयाने 244 प्रकरणांमध्ये 1,330 किलोग्रॅमपेक्षा जास्त हायड्रोपोनिक गांजा जप्त केला असून, 286 व्यक्तींना अटक केली आहे. अंमली पदार्थ तस्करीविषयीच्या विभागाच्या कठोर उपाययोजना यातून प्रतिबिंबित होतात.

   

 

 

Trending

Exit mobile version