गोवा खबर

गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा सहाय्य दर महिन्याच्या १० तारखेला बॅंक खात्यात जमा होईल : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या चालू महिन्यापासूनगृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनांअंतर्गत देण्यात येणारी मदत दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत कोणत्याही विलंबाशिवाय लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे जाहीर केले  ज्यामुळे लाभार्थ्यांना अधिक पारदर्शकतासोयीस्करता आणि वेळेत मदत मिळेल असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आज महिला आणि बाल विकास मंत्री विश्वजित राणे आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनांअंतर्गत गोव्यातील २.२४ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना बॅंक खात्यात एका क्लिकवर ४५.२६ कोटी रुपये जमा केले.

मुख्यमंत्र्यांनी या योजना कुटुंबेमहिलाज्येष्ठ नागरिकविधवा आणि इतर असुरक्षित घटकांसाठी सामाजिक सुरक्षा देते. अशा योजना अंत्योदय धोरणाच्या वचनबध्दतेची ग्वाही देते असे मुख्यमंत्र्यानी सांगितले. योजनांचा नियमित लाभ घेण्यासाठी दरवर्षी १ एप्रिल ते ३० मे या कालावधीत जीवन प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनांबाबत कोणत्याही अडचणीसाठी समाज कल्याण खात्याच्या सहाय्यक संचालक रश्मी राऊळ यांच्याशी ९३२२०६६०७८ आणि गृह आधार योजनेसाठी महिला आणि बालविकास खात्याच्या समाज कल्याण अधिकारी श्रीमती कृतिका मांद्रेकर यांच्याशी ९२८४२३८५००वर संपर्क साधावा अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

महिला आणि बालविकास मंत्री विश्वजित राणे म्हणाले कीसरकार लोकांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध योजना आणि धोरणांचे लाभ नागरिकांना कालबद्ध पद्धतीने देण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी सरकार प्रत्येक पाऊल उचलत आहे असे ते म्हणाले.

याप्रसंगी गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनांअंतर्गत नवीन नोंदणीकृत लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वाटप करण्यात आली. समाज कल्याण संचालक दीपक देसाई आणि महिला आणि बाल विकास संचालक ज्योती देसाई आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version