गोवा खबर : गोव्यातील रस्ते अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे. विधानसभेत सादर केलेल्या माहितीनुसार, २०२२ ते जानेवारी २०२६ या चार वर्षांत राज्यात १,४०५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या काळात एकूण २,१७६ अपघात नोंदवले गेले आहेत.
आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. सरकारतर्फे वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी, विशेष मोहीम आणि रस्ते सुरक्षेसाठी जनजागृती मोहीम राबवली जात असली, तरी अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे झाले असल्याचेही निदर्शनास आले आहे.