गोवा खबर

राज्यात एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत : मुख्यमंत्री सावंत

Published

on

Spread the love

 गोवा खबर : पश्चिम आशियातील युद्धासदृश परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तणावाचा गोव्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

विधानसभेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्याकडे घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी एका महिन्याचा एलपीजी सिलिंडरचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. राज्य सरकार तेल कंपन्यांशी सतत संपर्कात असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. तसेच, केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत आभासी बैठक घेण्यात आली असून, परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष आहे.

Trending

Exit mobile version