गोवा खबर : गोव्यात जागतिक महिला दिनानिमित्त सदा येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी महत्त्वाची घोषणा केली की, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आगामी अर्थसंकल्पात ‘गृहआधार’ योजनेच्या अनुदानात वाढ करणार आहेत. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावे आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला रमेश तवडकर, संकल्प आमोणकर, सुवर्णा तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.