गोवा खबर

हिंदु जनजागृती समितीने केलेल्या तक्रारीची दखल

Published

on

Symbolic Image
Spread the love
  • ‘होळी पार्ट्या’साठी अनुमती घेतली आहे का याची पडताळणी करण्याचा उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांचा आदेश
  • अल्पवयीनांचा पार्ट्यांमध्ये समावेश करणार्‍या आयोजकांवर कारवाईचे निर्देश

गोवा खबर : गोव्यात होळीच्या पार्श्वभूमीवर अनेक नाईट क्लब्स, ‘रिव्हर क्रूझ’ आदी ठिकाणी ‘होळी पार्ट्यां’चे आयोजन करण्यात आले आहे. हडफडे येथील नाईट क्लबमधील आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘होळी पार्ट्यां’चे आयोजन करणार्‍या नाईट क्लबकडे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक परवाने आहे का? याचीही चौकशी करावी, तसेच अल्पवयीनांना सहभागी होण्यास अनुमती देणार्‍यांवर कारवाई करावी, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली होत्या.

उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी या तक्रारीची नोंद घेऊन ‘होळी पार्ट्या’चे आयोजन करणार्‍यांनी शासकीय अनुमती घेतली आहे का याची पडताळणी करणे, तसेच ८ वर्षांहून अधिक वयोगटातील मुलांना पार्ट्यांमध्ये सहभागी करणारे आयोजकांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, महिला आणि बाल कल्याण खात्याचे संचालक आणि कांदोळी पंचायतीचे सचिव यांना हा आदेश काढला आहे. या प्रकणांचे तातडीने अन्वेषण करून त्याचा अनुपालन अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, गोव्यातील अनेक नाईट क्लब्स, ‘रिव्हर क्रूझ’ आदी ठिकाणी होळीच्या पार्श्वभूमीवर ‘होळी पार्ट्यां’चे आयोजन केले आहे. यामध्ये ‘रेन डान्स’, ‘पूल पार्टी मॅडनेस’, ‘बॉलीवूड डिजे’, ‘इंडियन ढोल डान्स’ आदींचा समावेश आहे. ‘हयात सेंट्रीक होळी बॅश’ या पार्टीमध्ये बिअरचा अमर्यादित पुरवठा केला जाणार आहे, तसेच निरनिराळे मद्यही पुरवले जाणार आहे. या ठिकाणी ८ वर्षांवरील मुलांना सहभागी होता येणार आहे. यामुळे हिंदूंच्या पवित्र होळी सणाची चुकीची ओळख निर्माण होणार आहे. या पार्ट्या त्वरित थांबवाव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली होती.

Trending

Exit mobile version