गोवा खबर

वडील-मुलाच्या जोडीपासून पणजीला वाचवू : वाल्मिकी नाईक यांचे आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर : आगामी पणजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने ‘आम्ही पणजीकर’ पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे. आपचे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी बाबुश मोन्सेरात आणि त्यांचे पुत्र रोहित मोन्सेरात यांच्यावर टीका केली.

नाईक म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत या बाप-लेकाच्या जोडीने पणजी शहराचे वाटोळे केले आहे. अनुभवाचा अभाव असलेल्या व्यक्तीला महापौर पदावर बसवून पणजीच्या वारसा स्थळाचे नुकसान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पणजीकरांनी आता बदलासाठी ‘आम्ही पणजीकर’ पॅनलच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Trending

Exit mobile version