गोवा खबर : गोव्याच्या जमिनी वाचवण्यासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ‘कलम १६-ब’ चा मुद्दा तापला आहे. आरजीपीचे (RG) प्रमुख मनोज परब यांनी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्यावर आरोप केले.
परब यांच्या मते, सरदेसाई यांनी मंत्री असताना १६-ब कलम आणून गोव्याच्या पर्यावरणाचा नाश केला. सरदेसाई या आंदोलनात सहभागी न झाल्याने परब यांनी त्यांच्यावर ‘सेटिंग’ केल्याचा संशय व्यक्त केला. दुसरीकडे, सरदेसाई यांनी हे आरोप फेटाळून लावत “आरोप करणाऱ्यांची उत्तर देण्याइतकी पात्रता नाही” असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.