गोवा खबर : विद्यार्थ्यांमध्ये संशोधक आणि उद्योजक वृत्ती निर्माण करण्यासाठी ‘कन्व्हर्ज ३.०’ या भव्य परिषदेचे आयोजन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर करण्यात आले. याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवून नोकरी शोधणारे बनवायचे नाही, तर त्यांना समाजातील समस्या सोडवणारे (Problem Solvers) बनवायचे आहे. ‘क्लासरूम ते करिअर’ हा प्रवास सुखकर करण्यासाठी ५० महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी उच्च शिक्षण संचालनालयाला ‘स्कोच पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.