गोवा खबर

पाळे-शिरदोणच्या नागरिकांचा टीसीपी कार्यालयात ठिय्या

Published

on

Spread the love
  • कलम ३९ अ रद्द करण्याची मागणी; जोपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा

गोवा खबर : नगर नियोजन खात्याच्या (TCP) कायद्यातील वादग्रस्त कलम ३९ अ च्या विरोधात पाळे-शिरदोण येथील नागरिकांनी शुक्रवारी मुख्य नगर नियोजकांच्या कार्यालयात जोरदार ठिय्या आंदोलन केले. हे कलम तातडीने रद्द करावे आणि त्याअंतर्गत प्रस्तावित केलेले झोन बदल थांबवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आमदार विरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने कार्यालयात धाव घेतली. आंदोलकांचा आरोप आहे की, या कलमाचा वापर करून पर्यावरणाचे नुकसान करणारे बदल केले जात आहेत.

आमदार बोरकर म्हणाले की, जोपर्यंत सर्व नऊ झोन बदल प्रस्ताव पूर्णपणे रद्द होत नाहीत, तोपर्यंत नागरिक कार्यालयातून हलणार नाहीत. यावेळी मुख्य नगर नियोजक वर्तिका डागूर यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांचे निवेदन संबंधित सचिव आणि मंत्र्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याचे आश्वासन दिले.

Trending

Exit mobile version