गोवा खबर

व्याघ्र प्रकल्पाच्या फाईल्स गायब; सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील प्रस्तावित ‘महादई व्याघ्र प्रकल्पा’शी संबंधित महत्त्वाच्या फाईल्स सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डमधून गायब झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

* नेमके प्रकरण काय?

८ सप्टेंबर २०२५ रोजी न्यायालयाने दिलेला एक महत्त्वाचा आदेश अधिकृत कागदपत्रांमधून गहाळ झाला आहे. हा न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचे ताशेरे ओढत, सरन्यायाधीशांनी सचिव-जनरल यांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

* पुढील पाऊल:

‘गोवा फाउंडेशन’ या संस्थेने व्याघ्र प्रकल्पासाठी याचिका दाखल केली आहे. आता या फाईल्स कशा गायब झाल्या, याची सत्यता लवकरच समोर येईल.

Trending

Exit mobile version