गोवा खबर

स्पेनच्या अध्यक्षांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर : स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत-स्पेन मैत्री अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. या चर्चेत विशेषतः संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांवर भर देण्यात आला.

दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून साजरे करत आहेत. X या समाज माध्यमावरील वेगवेगळ्या संदेशात पंतप्रधानांनी लिहिले: “दिल्लीमध्ये राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ यांच्यासोबत फलदायी बैठक झाली. विशेषतः संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात भारत-स्पेन मैत्री अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. आपले देश 2026 हे भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून साजरे करत आहेत. यामुळे लोकांमधील संबंध अधिक दृढ होतील. विद्यापीठांचे एक मोठे शिष्टमंडळ भारतात आल्याचे पाहून आनंद झाला. यामुळे आपल्या लोकांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल.

Trending

Exit mobile version