गोवा खबर

ज्येष्ठ पत्रकार पॉल कार्व्हालो यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी चालकास जामीन

Published

on

Spread the love

गोवा खबर : ज्येष्ठ पत्रकार पॉल कार्व्हालो यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाहनचालकास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अपघाताच्या वेळी वाहन चालवणारा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक तपासातून संशय व्यक्त करण्यात आला होता.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पॉल यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गोव्यातील पत्रकार वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात आली होती. पोलिसांनी संबंधित चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

न्यायालयाने प्रकरणातील पुरावे, तपासाची दिशा आणि इतर बाबींचा विचार करून ठरावीक अटींवर जामीन मंजूर केला आहे.

Trending

Exit mobile version