गोवा खबर

भगवान शिव आणि श्री गणेशाचा अवमान करणारी जाहिरात कंपनीने घेतली मागे

Published

on

Spread the love

हिंदु जनजागृती समितीच्या लढ्याला यश !

गोवा खबर: महाशिवरात्रीचे भक्तीमय वातावरणात असतांना ‘श्री गणेश ग्लोबल गुलाल प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने छत्तीसगडमधील ‘दैनिक भास्कर’ आणि ‘हरिभूमी’ या वृत्तपत्रांत श्री गणेश आणि भगवान शिव यांचा वापर व्यावसायिक जाहिरातीसाठी करून देवतांचे विडंबन केले होतेया अपमानजनक जाहिरातीविरोधात समितीचे राज्य संघटक श्रीसुनील घनवट आणि छत्तीसगड येथील समितीचे श्रीकमल बिस्वाल यांनी पोलीस कारवाईची मागणी केली होतीसंबंधित कंपनीशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केलीसमितीच्या तीव्र विरोधामुळे कंपनीने अखेर आपली चूक मान्य केलीकंपनीने आता लेखी स्वरूपात बिनशर्त माफी मागितली असून जाहिरातही मागे घेतली आहेदेवतांचा अनादर थांबवून त्यांची पवित्रता राखण्यात समितीला हे यश मिळाले आहे.

       आक्षेपार्ह जाहिरात या जाहिरातीत व्यावसायिक फायद्यासाठी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानजनक चित्रण करण्यात आले होतेजाहिरातीत पूज्य श्री गणेशाच्या हातांत ‘गुलाल’ आणि ‘थंडाई’ची पाकिटे दाखवण्यात आली होतीजे देवतांना ‘मॉडेल’ म्हणून सादर करण्यासारखे आहेमहाशिवरात्रीच्या निमित्ताने देवतांना सेल्समन‘ (विक्रेताप्रमाणे दाखवून त्यांच्या दिव्य स्वरूपाचे व्यापारीकरण करण्यात आले होतेयाशिवाय भगवान शिव आणि शिवलिंगाच्या अवतीभवती ‘कॅप्टन अमेरिका’सारखी परदेशी काल्पनिक पात्रे आणि इतर उत्पादने दाखवणेहा हिंदू श्रद्धेचा घोर अपमान आणि उपहास होता.

         कंपनीने मान्य केली चूक! : तीव्र विरोध झाल्यानंतर कंपनीचे संचालक उमंग गोयल यांनी मान्य केले कीभगवान श्री गणेशाच्या हातांत स्वतःचे प्रोडक्ट‘ दाखवणे ही त्यांची एक मोठी चूक आणि अनावधानाने झालेली गंभीर चूक” होतीही दुर्दैवी घटना चुकीमुळे घडली असून समस्त हिंदू सनातनी समाजाची आम्ही अंतःकरणपूर्वक माफी मागतोअसे कंपनीने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहेतसेच भविष्यात अशी चूक पुन्हा कधीही करणार नाहीअसे आश्वासनही कंपनीने दिले आहे.

        समितीची भूमिका स्पष्ट करतांना म्हटले आहे की, हिंदू देवतांचा जाहिरातींसाठी वापर करणेहा त्यांच्या पवित्रतेचा आणि दिव्यत्वाचा अनादर आहेज्याप्रमाणे इतर धर्मांच्या श्रद्धास्थानांबाबत संवेदनशीलता दाखवून त्यांच्या धार्मिक भावना जपल्या जाताततशीच गंभीरता हिंदूंच्या श्रद्धेबाबतही असायला हवीकोणत्याही कंपनीला आपल्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी हिंदूंच्या देवतांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. ‘कला’ अथवा ‘सर्जनशीलता’च्या नावाखाली धार्मिक भावनांशी दुखावणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर लढा आणि जनजागृती सातत्याने सुरू राहीलअसा इशारा समितीने दिला आहे.

Trending

Exit mobile version