गोवा खबर

अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; दक्षिण गोव्यात १.२० कोटींचे ड्रग्ज जप्त

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्यटन हंगाम आणि कार्निव्हलच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोहीम तीव्र केली आहे. दक्षिण गोवा पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये कोकेन, एमडीएमए (MDMA) आणि चरसचा समावेश आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यात नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे.

दुसरीकडे, पर्वरी पोलिसांनी देखील कारवाई करत एका संशयिताकडून २५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अमली पदार्थांचे रॅकेट मुळापासून उपटून टाकण्यासाठी पोलीस सध्या हाय अलर्टवर आहे.

Trending

Exit mobile version