गोवा खबर : सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याच्या भविष्यातील विकासासाठी ‘विकसित गोवा २०३७’ ही संकल्पना मांडली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आवाहन केले की, राज्याच्या प्रगतीसाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी जनतेने सरकारला सकारात्मक पाठिंबा द्यावा.
कामत यांनी दक्षिण गोव्यातील नवीन ‘कुशावती’ जिल्ह्याच्या निर्मितीचे स्वागत केले असून, यामुळे प्रशासकीय कामांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. विकासकामांना होणारा विरोध राज्याच्या हिताचा नसल्याचे सांगत त्यांनी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला.