गोवा खबर

‘अमली पदार्थांला नाही म्हणा’ रील मेकिंग स्पर्धा

Published

on

Spread the love

गोवा खबर : अमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध जागरूकता करण्यासाठी आणि निरोगीसकारात्मक जीवन निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी समाज कल्याण संचालनालयाने रील मेकिंग स्पर्धेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तयार केलेल्या आणि अंमलबजावणी केलेल्या अंमली पदार्थांच्या मागणी कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा (NAPDDR) या केंद्रीय योजने अंतर्गत ही स्पर्धा आयोजित केली आहे.

अमली पदार्थाला नाही म्हणा (जागरूकताप्रतिबंध आणि सकारात्मक जीवन निवडॉ) या विषयावर रील मेकिंग स्पर्धा दोन श्रेणींमध्ये आयोजित केली आहे – विद्यार्थी श्रेणी आणि सामान्य नागरिक श्रेणी मध्ये आयोजित केली आहे.

रीलचा कालावधी किमान ६० सेकंद आणि जास्तीत जास्त ९० सेकंद असावारील इन्स्टाग्रामवर @socialwelfare.goa, @yuva.panaji यांच्याशी सहयोगी असणे आवश्यक आहे. रीलमध्ये कोणताही स्पष्टआक्षेपार्हहिंसक किंवा अनुचित कंटेंट वापरण्यास परवानगी नाही. रील मूळ असणे आवश्यक आहे. कोणताही डेरिव्हेटिव्ह किंवा कॉपी केलेला कंटेंट अपात्र ठरविला जाईल. रील इंग्रजीहिंदीकोकणी किंवा मराठीमध्ये असावा. सबटायटल्सना प्रोत्साहन दिले जाईल. ५०% सर्जनशीलता आणि ५०% कंटेंट आणि मेसेज स्पष्टता (लाइक्सव्ह्यूज किंवा पोहोच विचारात घेतली जाणार नाही) हे निर्णायक निकष असतील. रीलमध्ये कोणत्याही स्वरूपात अंमली पदार्थ प्रचार किंवा गौरव करू नये.

रील अपलोड करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी  २०२६ अशी आहे. निवडलेल्या रील जागरूकता हेतूंसाठी वापरण्याचा अधिकार आयोजकांकडे राखीव आहे. न्यायाधीशांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल. शॉर्टलिस्ट केलेल्या नोंदींसाठी श्रेणी निश्चित करण्यासाठी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

दोन्ही गटांसाठी पहिले बक्षीस  रूपये १०,००० हजार, दुसरे बक्षीस रूपये ,००० हजार,  तिसरे बक्षीस रूपये ,०००हजार   आणि ४ हजार रूपयांची ५  उत्तेजनार्थ बक्षिसे आणि सहभाग प्रमाणपत्रे दिली जातील.

Trending

Exit mobile version