गोवा खबर : JSW स्टील माइनिंग डिव्हिजन गोवातर्फे बिचोलीम येथील कुदनेम येथील पहिल्या कार्यरत खाणीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी JSW स्टील माइनिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) सॉविक मजूमदार यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेत JSW स्टीलचे योगदान अधोरेखित केले. स्टीलसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्वयंपूर्णता साधण्यासाठी खनिज पुरवठ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
खनन कामकाजात सुरक्षितता नियम व पर्यावरण संरक्षणाचे काटेकोर पालन केल्याबद्दल त्यांनी खाण कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
कुदनेम खाणीत अलीकडेच खनन कार्य सुरू झाले असून, येथील लोखंडी धातू देशांतर्गत वापरासाठी यशस्वीपणे पाठविण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला JSW स्टील माइनिंगचे गोवा बिझनेस हेड वाय. नागेंद्र तसेच फोमेंतो मिनरल अँड रिसोर्सेसचे प्रमुख राजीव कुमार उपस्थित होते.