गोवा खबर

‘आप’च्या मोफत आरोग्यसेवेच्या संकल्पनेची मोठी झेप : केजरीवालांकडून पंजाबमध्ये १० लाख रुपयांच्या आरोग्य विमा योजनेची घोषणा!

Published

on

Spread the love

गोवा खबर : आज मोहाली येथे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बहुचर्चित “मुख्यमंत्री आरोग्य योजना” घोषित केली.

पंजाबमधील ३ कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. ही एक आदर्श योजना असून पंजाबमध्ये नव्या आरोग्य क्रांतीची सुरुवात आहे.

आम आदमी पार्टीच्या या आरोग्य विमा योजनेअंतर्गत मिळणार :—
प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांपर्यंतचे देशातील उच्च दर्जाचे वैद्यकीय संरक्षण.

लाभार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही.

सुमारे २,३५० पेक्षा जास्त वैद्यकीय उपचार पूर्णतः कॅशलेस म्हणजे मोफत.

खासगी व शासकीय अशी ९०० पेक्षा अधिक रुग्णालये योजनेत सहभागी.

Trending

Exit mobile version