गोवा खबर : गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून, ‘मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा’ योजनेअंतर्गत आता अयोध्या आणि वालांकनी या धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी चार नवीन यात्रांचे नियोजन करण्यात आले आहे. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या प्रवासाचे वेळापत्रक जाहीर केले असून आजपासून यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रवासाचे वेळापत्रक:
* ९ जानेवारी: वालांकनी (तामिळनाडू)
* १९ जानेवारी, २६ जानेवारी आणि २ फेब्रुवारी: अयोध्या (उत्तर प्रदेश)
योजनेच्या अटी व नियम:
* पात्रता: अर्जदाराचे वय ५० ते ७० वर्षांच्या दरम्यान असावे. व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
* नोंदणी: इच्छुक नागरिकांनी www.yatraconnect.in या पोर्टलवर किंवा मोबाईल अॅपवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेपासून ही नोंदणी सुरू झाली आहे.
* वैद्यकीय कागदपत्रे: अर्जदाराला क्षयरोग, हृदयरोग किंवा कोविड-१९ यांसारखे संसर्गजन्य आजार नसल्याचे स्वयं-वैद्यकीय प्रमाणपत्र आणि घोषणापत्र देणे अनिवार्य आहे.
* सुविधा: प्रत्येक यात्रेसाठी किमान ७५० यात्रेकरूंची संख्या निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, लाभार्थ्यासोबत एक अटेंडंट (सहकारी) विनामूल्य प्रवास करू शकतो.