गोवा खबर

गोव्यातील उड्डाणपुलांची स्थिती : दाबोळी डिसेंबर २०२५ तर पर्वरी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या कामांना वेग आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दाबोळी उड्डाणपुलाची पाहणी केली आणि हे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य कंत्राटदाराला दिले आहे. या पुलामुळे दाबोळी विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. तसेच वेर्णा येथे ‘अंडरपास’ देण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

दुसरीकडे, पणजीला जोडणाऱ्या पर्वरी उड्डाणपुलाबाबत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी माहिती दिली की, हा पूल डिसेंबर २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल. कामाचा वेग वाढवण्यासाठी काही पर्यायी मार्ग २ जानेवारीपासून कार्यान्वित करण्यात आले आहेत. पर्यटनाबाबत बोलताना खंवटे म्हणाले की, यंदा पर्यटकांचा ओघ चांगला होता, मात्र विमान उड्डाणे कमी झाल्याचा आणि काही घटनांचा थोडा परिणाम झाला आहे. तरीही रस्ते मार्गे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

Trending

Exit mobile version